
समजा सेवा
सामाजिक उपक्रम व सत्कार


महापूर २००५
२००५ साली महापुरा मध्ये पूरग्रस्तांना धान्य वाटप करताना मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी.

नियाज कडोले त्यांच्या कुटुंबियांना मदत
शिवशक्ती तरुण मंडळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर या मंडळाचे अध्यक्ष नियाज कडोले यांचे गणेश चतुर्थी दिवशी मंडळाची मूर्ती आणताना अपघाती मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मदत करताना मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते.


सिद्धगिरी मठ साठी मदत
२०१९ साली आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरग्रस्तांना मंडळाच्या वतीने निधी स्वरूपात सिद्धगिरी मठ कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कोरोना महामारीवेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मंडळाच्या वतीने धनादेश कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना देताना.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आश्रम मदत
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आश्रम येते मदत केली गेली, यावेळी उपस्थित मंडळाचे पधादिकारी आणि आश्रम चे सेवक.


अल्पोपहार आणि पाणी वाटप
कोल्हापूर एक मराठा लाख मराठा मूक मोर्चाला जाहीर पाठिंबा देऊन मोर्च्यातील हजारो लोकांना अल्पोपहार आणि पाणी वाटप केले.

कॅप्टन सार्थक याचा सत्कार
भारतीय सैन्य दलात कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्याबद्दल कॅप्टन सार्थक याचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यश सबनीस याचा सत्कार
कोल्हापूर ते नेपाळ व नेपाळ ते कोल्हापूर 5500 km चा प्रवास बुलेट वरून एकट्याने पूर्ण केल्याबद्दल यश सबनीस याचा सत्कार करणेत आला.

कॅप्टन सार्थक याचा वडिलांचा सत्कार
कॅप्टन सार्थक यांना आपल्या रिक्षा व्यावसायावर उत्तम शिक्षण देऊन भारतीय सैन्यातील एक जबाबदार अधिकारी बनवण्यात त्याच्या वडिलांचा मोलाचा हात होता म्हणून त्यांचा ही सत्कार करण्यात आला.

कु. आवळे याचा सत्कार
राजारामपुरी मातंग वसाहत मधील होतकरू हुशार मुलगा कु आवळे ज्यांने लंडन विद्यापीठ मधील पदवी संपादन केली त्याबद्दल त्याचे विशेष सत्कार करताना मंडळाचे पदाधिकारी

गुणी विद्यार्थांचे कौतुक
समाजातील गुणी विद्यार्थांचे कौतुक आणि प्रोत्साहन मंडळाच्या वतीने करण्यात येते .