इतिहास
मंडळाचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९७२ साली मंडळाची स्थापना झाली.

F.A.Q
भाविकांनी विचारलेले काही प्रश्न
-
मंडळाची स्थापना केव्हा झाली ?
मंडळाची स्थापना १९७२ साली झाली.
-
मंडळाची स्थापना कोणाच्या प्रेरणेतून झाली ?
मंडळाची स्थापना लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून झाली.
-
मंडळा मार्फत गणेशोत्सव कोठे होतो ?
मंडळा मार्फत गणेशोत्सव राजारामपुरी २री गल्ली मेन रोड कोल्हापूर येथे होतो.
-
मंडळा मार्फत आणखीन कोणकोणते उत्सव साजरे केले जातात ?
मंडळा मार्फत शिवजयंती ,दही हंडी ,होळी, हे उत्सव साजरे केले जातात.
-
गणेश मूर्ती कोणत्या स्वरूपाची असते ?
गणेश मूर्ती बैठी असते ज्या मूर्तीला पोटल्या गणेश म्हणून ओळखले जाते.
-
उत्सव काळात आरती पूजा किती वेळा केली जाते ?
उत्सव काळात आरती पूजा दोन वेळा केली जाते सकाळी व संध्याकाळी.
-
आरती पूजा यांची वेळ ठरलेली असते का व असल्यास कोणती ?
आरती पूजा यांची वेळ ठरलेली असते सकाळी ८:३० वाजता व संध्याकाळी ७:०० वाजता.
-
दर्शन केव्हा उपलब्ध असते त्या संबंधी काही नियम इत्यादी आहे का ?
उत्सव काळात दर्शन सकाळी ८:४५ पासून रात्री बंद करे पर्यंत चालू असते पण महिलांन करीता दर्शन सकाळी ८:४५ ते सायंकाळी ५:३० पर्यंत उपलब्ध असते.
-
अभिषेक पूजाची सुरवात कधी पासून केली गेली ?
अभिषेक पूजा २०१६ पासून सुरू झाली.
-
अभिषेक पूजा कोण करू शकतो ?
अभिषेक पूजा सर्वांकरिता उपलब्ध असते त्या करीता काही विशेष अटी नाहीत पण आधी एक दिवस आपले नाव द्यावे लागते.
-
उत्सव काळात एखाद्याला यायला जमले नाही पण त्याला अभिषेक पूजा करावयाची असल्यास काय करावे लागेल ?
अभिषेक पूजा करण्याकरीता असणारी दक्षिणा मंडळाच्या खात्यामध्ये जमा करून पावती घ्यावी त्या नंतर त्यांच्या नावाने अभिषेक पूजा केली जाते.
-
अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या गणपती दूध पितो या विषयात मंडळाची काय भूमीका होती ?
पहिला म्हणजे मंडळ हे गणेश चतुर्थी उत्सव साजरी करते त्यामुळे मूर्ती विसर्जन विसर्जन दिवशी होते त्यामुळे हा प्रयोग आम्हाला पाहता नाही आला पण शास्त्रज्ञांनी केलेला दावा व भक्तांची श्रद्धा यांना कोठेही ठेच पोहोचू न देण्याचे भूमिका मंडळाने बजावली.
-
मंडळाच्या वतीने कोणकोणते सामाजिक कार्य केले गेले ?
मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना धान्य वाटप, आर्थिक मदत, वृक्षारोपण, अनाथ आश्रम, वृध्द आश्रम यांना वस्तुरूपी तथा आर्थिक मदत, हृदय शस्त्रक्रिया करिता निधी, स्वच्छता मोहीम, गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यता निधीस देणगी असे अनेक उपक्रमात मंडळ अग्रेसर असते.