
आरती आणि अभिषेक
क्रियाकलाप | वेळ |
---|---|
अभिषेक पूजा | सकाळी ७:०० वा. |
सकाळची आरती | सकाळी ८:३० वा. |
सार्वजनिक दर्शन | सकाळी ०८:४५ ते संध्याकाळी ०५:००. |
संध्याकाळची आरती | संध्याकाळी ७:०० वा. |
सार्वजनिक दर्शन | संध्याकाळी ०७:३० ते ११:३०. |
राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ
छत्रपती शिवाजी महाराज यांची एकीची संकल्पना छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा, ज्योतिबा फुले, आणि लोकमान्य टिळक यांच्या विचाराने प्रेरित होऊन १९७२ साली राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाची स्थापना राजारामपुरी २री गल्ली येथे झाली. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना शिस्त ,शांतता आणि भक्तिभाव यांना प्राधान्य दिले. वेगवेगळे पारंपरिक वाद्य हे गणेश मिरवणुकीचे आकर्षण असते. आकर्षक विद्युत रोषणाई, विविध मंदिरे, कलाकृती आणि सजावट याला सर्व भक्त मंडळींनी भरभरून दाद दिली. बैठी आणि सुरेख अशी एकाच साच्याची कायमस्वरूपी गणेशमूर्ती भक्तांना मोहून टाकते आणि भक्त ही तिच्या रूपात तल्लीन होऊन जातात.
फक्त गणेश उत्सवच नाही तर इतर उत्सव दहीहंडी, होळी आणि शिवजयंती ही मंडळा मार्फत साजरी केली जाते.
मंडळाने समाज प्रबोधन, पूरग्रस्त निधी, वृक्षारोपण, अनाथ आश्रम व वृद्ध आश्रम यांना मदत, हृदय शस्त्रक्रिया करीता निधी, स्वच्छता मोहीम, गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, अशी सामाजिक कार्य केले असून पूरग्रस्त लोकांना घरे बांधणी धान्य वाटप करीता कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि काढसिद्धेश्वर मठ कणेरी यांच्या सहाय्यता निधीस निधी रूपात मदत तसेच कोरोना करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी रूपात मदत. आशा अनेक मदती मंडळा मार्फ़त मदत केल्या गेल्या. आज मंडळ जे नावारूपास आले ते मंडळातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामूळे आणि सहकार्यामुळे. त्याच बोरोबर असंख्य भक्तांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.
आमच्या मंडळाचे संस्थापक मंडळ आणि चालू मंडळ बद्दल जाणून घेण्या करीत खालील बटण वरती क्लिक करा...
रोजची आरती
क्रियाकलाप | वेळ |
---|---|
अभिषेक पूजा | सकाळी ७:०० वा. |
सकाळची आरती | सकाळी ८:३० वा. |
सार्वजनिक दर्शन | सकाळी ०८:४५ ते संध्याकाळी ०५:००. |
संध्याकाळची आरती | संध्याकाळी ७:०० वा. |
सार्वजनिक दर्शन | संध्याकाळी ०७:३० ते ११:३०. |
आजची पूजा
कोल्हापूर जिल्हा पोलीस दला तर्फे राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ २री गल्ली कोल्हापूर. या मंडळास व त्यांचा कार्यकर्त्यांना "गणेशउत्सव ९७" मध्ये सामाजिक प्रभोधन करणारे देखावे/कार्यक्रम आणि उत्तम शिस्त यांचे प्रदर्शन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्या करीता विशेष सहकार्य केल्याबद्दल तृतीय क्रमांकाचे बक्षिस / सन्मानपत्र प्रदान कारण्यते येत आहे.
राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ २ री गल्ली यांना गणेश देखावा या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल हे प्रशस्तिपत्र देण्यात येत आहे.
राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ २ री गल्ली यांना गणेश उत्तसृष्ट देखावा या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल हे प्रशस्तिपत्र देण्यात येत आहे.
देणगी तपशील
खाते क्रमांक. | : | ०३००२०१००१५२५ |
---|---|---|
IFSC Code | : | CNRB0000300 |
शाखा | : | राजारामपुरी, कोल्हापुर-४१६००८. |